top of page

"एकच ध्येय ....
सामर्थ्याचे आणि आकाशाला गवसणी घालण्याचे"


 

c4398812-b8df-4610-ab97-be97dbb5ea2c_edi

ज्ञानाच्या गुरुंची ओळख करा

आमचा दृष्टिवंत नेता

मा. पी. जी. पाटील सर

पांडुरंग गणपती (बा) पाटील सर यांनी आपल्या शैक्षणिक अध्यापक क्षेत्रामध्ये दिनांक ८/१०/१९५६ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात केली. व निवृत्त होताना मुख्याध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झाले.

सन १९७० पासून स्कॉलरशिप तसेच सैनिक स्कूल परिक्षेसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग चालू केले. राजीव गांधी पंतप्रधान असतांना भारत सरकारने १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २७ राज्ये व ७ केंद्र शाशीत प्रदेशामध्ये जवाहर नवोदय विद्यालय योजना सुरु केल्यानंतर सन १९८८ पासून पी. जी. पाटील सरांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षासाठीसुध्दा पूर्व तयारी वर्ग चालू केले.

शासनांने मा. श्री. पी. जी. पाटील सरांची शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन १९९१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती मा. शंकर दयाळ शर्मा यांचे शुभ हस्ते सन १९९१ चां आदर्श शिक्षक, राष्ट्रपती गौरव पुरस्कार प्रदान करणेत आला.

मा. श्री. पी. जी. पाटील सर हे मुलांच्या बौध्दीक विकासाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असून ते अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते आहेत. म्हणूनच स्वयंशिस्त व कठोर परिश्रमातून उत्कर्ष हे ब्रीद वाक्य सार्थ आहे. त्यामुळेच त्याच्या विद्यार्थाचे एकच ध्येय असते ते म्हणजे ध्येय सामर्थ्याचे अन् अवकाशाला गवसणी घालणेचे.

श्री. अजित पांडूरंग पाटील सर

आदर्श शिक्षक राष्ट्रपती गौरव पुरस्कार प्राप्त आदरणीय मा. श्री. पी. जी. पाटील सरांचे कनिष्ठ पुत्र असलेने श्री. अजित पांडुरंग पाटील हे आपल्या वडीलांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संस्कारक्षम शिक्षणाने घडलेले व्यक्तीमत्व असून संस्थेच्या कामामध्ये पुर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. (राज्य शास्त्र), तसेच पशु वैद्यकिय शास्त्रातील एल.एस.एस. ही पदविका प्राप्त केलेली आहे.

श्री. अजित पाटील सर हे सन २००० सालापासून फौंडेशनमध्ये विद्यादानाचे व सुसंस्कारक्षम विद्यार्थी घडविणेचे कार्य करीत असून आजअखेर सातत्याने फौंडेशनचा निकाल दर वर्षी ९० टक्केच्या वर लावणेमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे.

आमचे उद्दिष्ट!

आमची मुख्य मूल्ये

शिक्षण

ज्ञानाद्वारे सक्षमीकरण

आमचे मुख्य ध्येय व्यक्तींना शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आहे. आम्ही जीवन उंचावण्यासाठी आणि सातत्याने शिकणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करतो.

विकसनशीलतेला प्रेरणा देणे

सक्षमीकरण

सक्षमीकरण आपल्या सर्व उपक्रमांच्या मध्यात आहे. आम्ही व्यक्तींमध्ये वाढ, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो, आणि सक्षमी व्यक्तींच्या समुदायाची निर्मिती करत आहोत

समाज

बदलासाठी एकत्र येणे

वाढ आणि समर्थनावर केंद्रित एकसंध समाज निर्माण करणे हे आमच्या दृष्टीकोनाचे मुख्य लक्ष्य आहे. एकत्र, आम्ही एक उज्जवल भविष्याकडे काम करत आहोत, जिथे प्रत्येक व्यक्तीला मूल्य दिले जाते आणि सक्षमीकरण केले जाते.

Gallery

Phone: +919921626727

मु: मांगोली, पोस्ट: अकनूर,

तालुका: राधानगरी,

जिल्हा: कोल्हापूर
पिन: ४१६२१२

 

bottom of page